मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

FLN

निपुण भारत अभियान (FLN) च्या प्रभावी माता पालक गटांची स्थापना करुन ऑनलाईन नोंदणी करणेबाबत. शासन निर्णय व मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.अ. मुंबई यांचे संदर्भिय पत्रानुसार निपूण भारत अभियान (FLN) च्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शाळा, गाव, वस्ती स्तरावर करावयाच्या कामकाजाबाबतच्या मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच याबाबत मा.राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प्र.मुंबई यांनी १ ते ३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अधिका-यांना मार्गदर्शनपर व्ही.सी. द्वारे आवश्यक सूचना आपणास देण्यात आलेल्या आहेत.* सदरील व्ही.सी. मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रतिनिधी यांच्या सहकार्याने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शाळा स्तरावर १ ली ते ३री च्या शिक्षकांचे उद्धबोधन करून वेळोवेळी वरिष्ठांकडून प्राप्त होणा-या सूचनांप्रमाणे यथोचित कार्यवाही करावी. शाळा स्तरावरील इयत्ता १ली ते ३री च्या मातांचे गट करून प्रत्येक गटाला प्रमुख माता निवडून शाळेच्या मुख्याध्यापकांनी माता गटाची माहिती या लिंकवर भरावी. निपूण भारत अभियान (FLN) म...

हॉकीचा जादूगार.

 हॉकीचा जादूगार. देशात 2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान  यांनी खेळाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलवून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार केले आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस च्या जमान्यात आजकालची मुले कदाचीत हॉकी हा मैदानी खेळ होता तसेच भारतीय राष्ट्रीय खेळ होता हेच विसरले असतिल? कारण माझ्या मुलाला मी सहजच विचारले आपला राष्ट्रीय खेळ कोणता? तर त्याच उत्तर होत क्रिकेट. आता त्यात त्याची किंवा राष्ट्रीय खेळ माहीत नसणाऱ्या नवतरूनांची काय चुकी? एक तर आम्ही हॉकी बद्दल कमालीचे उदासीन . दुसरे शाळेत हॉकी सारखा मोठे मैदान लागणारे खेळ घेतल्या जात नाहीत, घेतले तर माझ्या सारख्या शिक्षकाला हॉकी खेळायचे अपुरे ज्ञान, वरून बॉल लागायची भिती वेगळी? टेलिव्हिजन वरून सुद्धा प्रक्षेपण कमीच? अनेक कारणे सांगता येईल? पण हाच हॉकीचा खेळ एकेकाळी जगात भारताची ओळख देत होता. त्या हॉकीचा भारतात आणि जगात ओळ...

#काळी पिवळी मारबत

इंग्रजांच्या राजवटीत देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी  नागपूर येथे मारबत उत्सव सुरू झाला. प्राचीन काळातील मानवजातीसाठी घातक ठरणाऱ्या रुढी-परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘काळी मारबत’! तर चांगल्या परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘पिवळी मारबत’. काळ्या मारबतीला १४१ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी चांगल्या आणि वाईट प्रतीकांची मिरवणूक काढली जाते, ती  म्हणजेच काळी व पिवळी मारबत मिरवणूक. शंभर वर्षांच्या काळात अनेक परंपरा लोप पावत असताना नागपूरने त्यांची मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक पंरपरा कायम ठेवली. अपवाद होता तो फक्त करोना काळातील दोन वर्षांचा.  नागपूरने शेकडो वर्षांपासून जपलेल्या बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली. दरवर्षी तान्हा पोळ्याच्या (लाकडी बैलांचा पोळा) दिवशी मिरवणूक काढली जाते. त्यात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे पुतळ्यांचे देखावे (बडगे) तयार केले जातात. मिरवणुकीच्या समारोपाला त्याचे दहन केले जाते. जुन्या नागपुरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत ...

#बैलपोळा

आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ..     पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतणदेण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला  हळद व तुपाने  शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल , सर्वांगावर गेरूचे ठ...

हरितक्रांतीचे प्रवर्तक वसंतराव नाईक. #Vasantrao Naik

 हरितक्रांतीचे प्रवर्तक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना स्मृतिस अभिवादन!!   वसंतराव नाईक हे  राजकारणी होते.  5 डिसेंबर 2006 1963 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ते 1975 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री आणि शेतकरी. ते प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळील गहुली या छोट्याशा गावात श्रीमंत शेतकरी कुटुंबात झाला. ते पुसद नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष होते. ते महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रवर्तक म्हणून ते परिचित होते.नाईक यांचे मूळ आडनाव राठोड होते; पण गहुलीची स्थापना चतुरसिंह राठोड यांनी केली. त्याने जमीन जमविली आणि आपल्या समाजाला स्थिर जीवन दिले. साहजिकच, ते बंजारा समाजाचा नेता झाले. तेव्हापासून त्याचे आडनाव नाईक झाले.चतुरसिंग यांचा मुलगा फूल सिंह नंतर या समुदायाचा नायक बनला. त्यांची पत्नी होनूबाई यांना राज सिंह आणि हजूसिंग अशी दोन मुले होती. हजू सिंग हे छोटे बाबा म्हणून ओळखले जायचे. नंतर त्यांचे नाव वसंतराव होते आणि वसंतराव नाईक म्हणून ते ओळ...

पारसी नूतनवर्ष दिन

पारशी संस्कृतीमध्ये झोराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार कालगणना होते. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच पतेति सण साजरा करण्यात येईल. तर पुढचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा दिवस पारसी नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाने पारशी कॅलेंडरमधील पहिला महिना फरवर्दीन या महिन्याची सुरुवात होते.पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.पारशी समुदाय हा मूळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते.पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं प...

# राजमाता अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर एक अतिशय,दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात  माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठ...

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते.व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला.भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रानटी सुलतानांच्या गुलामगिरीत होता आणि आता इंग्र...

#International Day of Indigenous People .@जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगल कामना"

दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो... "जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगल कामना"                  पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते. जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. 19 व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...