संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु अपघात व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या घरच्यांना स्वतःचा रक्तगट माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास महत्त्वाचे कार्य करते. भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तर...