मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी ६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाणंकोकिळा लतादीदी

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय संगीताचा झगमगता तारा, स्वरांचा अमूल्य ठेवा आणि अनंत काळापर्यंत मनोमनी घुमणारा सुरेल स्वर अशी लता मंगेशकर यांची ओळख शब्दांत मावणारी नाही. त्यांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण जगाला मोहित केले आणि आजही त्यांच्या गाण्यांमधून ते सूर आपल्या हृदयात जिवंत राहतील. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. संगीत हा त्यांच्या रक्तातच होता. वडील पं. दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध गायक व नटसम्राट होते, तर आई शेवंतीबाई यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तीन बहिणी आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि एक भाऊ  ह्रदयनाथ मंगेशकर या सर्वांमध्ये संगीताचा वारसा चालवण्याचे बळ होते. लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर गाण्याची सुरुवात केली. मात्र, नियतीने घाला घातला, आणि वडिलांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या नाजूक खांद्यावर येऊन पडली. पण हा परीक्षेचा क्षण त्यांनी धैर्याने स्वीकारला आणि संगीतातील आपला प्रवास अविरत ...