एकच प्रश्न स्वतःला विचारू - ‘झाडे कोणी तोडली? भीमाशंकर शंकर येथील जंगल हे एकेकाळी जगातले दोन क्रमांकाचे आदर्श जंगल मानले जायचे जिथे त्या भागात उगवू शकतील अशा सर्व वनस्पती होत्या आणि हवा सुद्धा शुद्ध होती. बाजूचे जंगल तसेच ठेऊन मध्यभागी ज्या पवनचक्क्या उभारण्यासाठी झाडांची कत्तल कोणी केली ? याचा पावसावर परिणाम होणारच ना. फक्त ३० - ३५ वर्षांपूर्वी महाबळेश्वर कसे होते आणि आज त्याचे काय झाले आहे ? कोणी केली झाडांची कत्तल आणि सिमेंटचे जंगल ? लोणावळा - खंडाळा ही एकेकाळी थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध होती. आता लोणावळा उजाड होत चालले आहे. कोणी केली झाडांची कत्तल ?झाडांच्या बाबतीत मला महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक जास्त आवडते. अजूनही कर्नाटक खूप हिरवे आहे पण जसे ते २०-२५ वर्षांपूर्वी होते तसे आज दिसत नाही. कोण करते झाडांची कत्तल ? मेळघाट अभयारण्य 25वर्षापूर्वी आम्हीं पाहिलेला आणि आजचा मेळघाट यामध्ये खूप फरक आहे.. जंगल ओसाड पडत आहेत.... १९७१ सालच्या युद्धात जरी विजय मिळाला असला तरीही युद्धाची किंमत ही मोजावीच लागते. अशाच वेळी भारतात दुष्काळ होता त्यामुळे त्या दुष्काळाची झळ ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।