मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#शाळाबाह्य मुलांचे शिक्षण.

शिक्षणात सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे शाळाबाहय मुले .....  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी चालवलेली चळवळ  संपूर्ण महाराष्ट्रानी पाहिलेली. अनेक समाजसुधारकानी महाराष्ट्रात शिक्षणासाठी अमुल्य उदाहरणे वा दिवा तेवत ठेवला . घटनेने दिलेला शिक्षणाचा हक्क वरील साऱ्या गोष्टी पाहता महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला दिसतो यात तिळमात्र शंका नाही पण जेव्हा आपण सिंग्लनवर शेकडो शाळाबाह्य मुलांना भिक मागतांना पाहतो. महाराष्ट्रातील हजारो विटभट्ट्यावर हजारो शाळाबाहय मुलांना काम करताना पाहतो . मोठ्या बांधकामासाठी आलेल्या झोपड्यात वावरतांना स्थलांतरीत झालेली हजारो शाळाबाहय मुलांना पाहतो . ऊस तोडीसाठी , कापुस वेचणीसाठी , संत्रातोडीसाठी , सोयाबिन कापणीसाठी स्थंलातरीत झालेली शेकडो मुलांना पाहतो त्यावेळेस शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असे का ? उत्तर एकच सर्वच स्तरावरून दुर्लक्षित केलेला घटक " शाळाबाहय मुले ". ही मुले फक्त का बालरक्षकाना दिसते असे नाही तर अधिकारी वर्गापासून तर मंत्री महोदयापर्यंत सर्वांनाच दिसते विशे...