मुख्य सामग्रीवर वगळा

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते.व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला.भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रानटी सुलतानांच्या गुलामगिरीत होता आणि आता इंग्रजांच्या अन्यायकारक जुलमी सत्तेखाली आला. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर यश न मिळता संपुष्टात आले.भारतामध्ये इंग्रजांनी शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्यामुळे सुशिक्षित तरुणांमध्ये विचारवंत निर्माण झाले. वेगवेगळ्या विचारवंत आणि देशभक्तांनी वर्तमानपत्रे सुरू केली राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केले आहे राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये जागृती निर्माण केली महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकहितवादी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र जागृत केला देशाच्या विविध भागांमध्ये विचारांच्या जागृतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने उभी राहिली.महात्मा गांधींनी सत्य अहिंसा शांतता या चिरंतन मार्गांनी भारताचा स्वातंत्र्य लढा अखंडपणे सुरू ठेवला. स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसा पर्यंत नेली याच वेळी हिंदुस्तानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर,भगतसिंग, सुखदेव,राजगुरू,सचिंद्रनाथ संन्याल, खुदीराम बोस, चंद्रशेखर आजाद,जतीनदास,अनंत कान्हेरे अशा अनेक क्रांतिकारकांनी देशभर सशस्त्र क्रांतीचा लढा सुरू करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्वांची नावे आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत. परंतु सर्वच देशभक्त आणि क्रांतिकारक आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर आलाच असे नाही. कारण इतिहासाची काही सोनेरी पाने अज्ञात असतात हा जणू इतिहासाला शापच असतो. भारताचे स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानचे धर्मावर आधारित दोन तुकडे होऊन प्राप्त झाले. फाळणीची भळभळती रक्ताळलेली जखम घेऊन भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज या गोष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.
देश स्वतंत्र झाला पण देशाच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने देशभक्त आणि क्रांतिकारकांनी वैभव शाली आणि बलवान भारत देशाचे स्वप्न पाहिले होते; एका समता, शांतता आणि बंधुता यांनी परिपूर्ण असणाऱ्या सार्वभौम भारत राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न आज साकार झाले का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांनी स्वतःला विचारला पाहिजे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा तर केलाच पाहिजे. कारण यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या अगणित ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक आणि देशभक्त यांना खऱ्याअर्थाने आदरांजली वाहता वाहता त्यांच्यातील देशभक्तीची जाज्वल्य भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा करता येईल. स्वातंत्र्याचा पावन मंगल दिन ज्यांनी आपल्याला दाखवला त्या महान देशभक्ताला स्मरावे; त्यांचा आदराने उल्लेख करावा; त्यांचे बलिदान व योगदान व्यर्थ गेले नाही हे आपल्या कृतीतून दाखवून द्यावे. यासाठी आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रत्येक नागरिकांनी अगदी आनंदाने साजरा करावा...
"ए मेरे वतन के लोगो जरा आंखो मे भरलो पानी,
जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.