मराठी राजभाषा दिवस: "अभिमान, अस्मिता आणि गौरवाचा उत्सव" मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. तिच्या शब्दांत इतिहासाचा ठेवा आहे, तिच्या गप्पांत मातीचा सुगंध आहे, आणि तिच्या अभिव्यक्तीत अस्मितेचा अभिमान आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेच्या गौरवासाठी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्या मातृभाषेच्या श्रीमंतीचा उत्सव, तिच्या अमृतमधुर स्वरांचा साज, आणि तिच्या साहित्यसंपदेचे वंदन करण्याचा सोहळा!. वि.वा. शिरवाडकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र "कुसुमाग्रज" या टोपणनावाने ओळखतो, हे मराठी साहित्यातील एक अढळ नक्षत्र होते. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याच्या विश्वात अमूल्य योगदान दिले. कवी, नाटककार, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून त्यांनी मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध केले. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते मराठी मनाला चेतवणारे विचारवंत होते. त्यांच्या लेखणीने महाराष्ट्रातील साहित्य, नाटक आणि सामाजिक जाणीव समृद्ध ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।