मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#संत रविदास @संत रविदास# मन चंगा तो कटौती में गंगा॥

संत रविदास  यांचा जन्म सुमारे इ.स. १३७७ मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या  गुरु ग्रंथ साहेब असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. रविदास यांचा जन्म वाराणशी जवळील  सीरगोवरधनपूर गावात झाला आहे. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम. त्यांचे पालक चामड्याचे काम करीत.  त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य  गंगा नदी च्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू ला...