मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल २९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिवस सकाळची शांत वेळ, उगवत्या सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत डोकावतात आणि समोर कपाटात ठेवलेली, धुळीनं झाकलेली पुस्तकं शांतपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पानांमध्ये  अखंड जीवनाच्या असंख्य गोष्टी बंदिस्त असतात. आज जागतिक पुस्तक दिन! आणि हाच तो दिवस, ज्या दिवशी जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच, हा दिवस  पुस्तकांच्या रूपाने  गौरव करण्यासाठी आहे. कोणतेही पुस्तक एका दिवसात जन्म घेत नाही. लेखकाच्या मनात कल्पनेची एक ठिणगी पडते. तो त्याच्या मनातल्या भावना, विचार, अनुभव यांना शब्दांत पकडू लागतो. लिहिताना तो रडतो, हसतो, जगतो. त्याच्या डोळ्यांत झोप नसते, हातात थरथर असते. प्रत्येक वाक्य म्हणजे त्याच्या आत्म्याचा एक अंश. हे पुस्तक तुमच्या हातात पोहोचेपर्यंत अनेक टप्पे पार करते,कागद, संपादन, मुद्रण, वितरण. ते केवळ शब्द नाहीत, तर लेखकाच्या हृदयाचा ठाव असतात. कधी तुम्ही कपाट उघडलंय का?          तिथे  रांगेत लावलेली पुस्तकं तुमच्याकडे बघत म्हणत अस...