मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

SHAHUJI MAHARAJ ...शैक्षणिक क्रांतीचे जनक :-"शाहू महाराज"

Shahuji Maharaj  --------------------------- शैक्षणिक क्रांतीचे जनक :-"शाहू महाराज" काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे हे आपण अनेक नेत्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकत असतो आणि पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला कि एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आज भारतात जातीवाद असला तरी त्याची धार बरीच बोथट झालेली आहे. आजही समाजात विषमता दिसून येत असली तरी त्याची तीव्रता व प्रमाण पूर्वीसारखे राहिलेले नाही. ह्याचे श्रेय शाहू, फुले, आंबेडकर ह्यांना व ह्यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांना जाते. बहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील व...

#जेष्ठ पौर्णिमा

जेष्ठ पौर्णिमा बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर  गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मास आलि तिचे नाव "सुजाता" होते.                         त्या गावी   असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या              वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून प...

#नेत्रदानाचे महत्व

*जागतिक दृष्टीदान दिन* नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक दृष्टीदान दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.  *डोळ्यांची काळजी  घ्यावी.... * चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं: - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा. सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा: - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत. * सेफ्टी ग्लासेस वापरा :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे. * संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास : वारंवा...

"राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020" शिक्षक : -बदलाचे प्रणेते.NATIONAL EDUCATION POLICY 2020

  राष्ट्रीय शिक्षण धोरण ~ शिक्षक : -बदलाचे प्रणेते NATIONAL EDUCATION  POLICY 2020                         शालेय शिक्षणातील सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना मूर्त उच्चशिक्षित व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षित आणि सुसज्ज शिक्षकांकडून शिकविले जाईल याची दक्षता घेणे. या धोरणानुसार शिक्षक “ समाजातील   सर्वात महत्वाचा   व्यक्ती आहेत आणि अपेक्षित बदलाचे प्रणेते ” आहेत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येणारे कोणत्याही प्रयत्नाचे यश शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. वंचित ग्रामीण व आदिवासी भागातील हुशार विद्यार्थ्यांना चार वर्षाचा एकिकृत केलेला  बीएड .अभ्यासक्रम घेता यावा या करिता  त्यांच्यासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल ,काही बाबतीत त्यांना त्यांच्या स्थानिक भागात रोजगाराची हमी देण्यात येईल .विशेषता विद्यार्थिनीवर खास लक्ष केंद्रित करण्यात येईल. सर्व शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती “ सर्वसमावेशक शिक्षक आवश्यकता नियोजन ” शैक्षणिक यावर आधारित कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून केली ...

💐शिवस्वराज्य दिन💐

हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी  ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होतो. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.  दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा पासून हा सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.                                    युगपुरुष,रयतेचा राजा, स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.अशा या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाज...

#अतिरिक्त स्क्रीन वापर #लहान मुले.

अतिरिक्त स्क्रीन वापर ही वाढीच्या वयातील मुलांमध्ये डोळ्याचे दोष निर्माण करणारी गोष्ट आहे अनेक मुले तास न् तास मोबाईल पाहतात. अंधारामध्येही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक असते. सतत स्क्रीनवर पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे दोष निर्माण होतात. संशोधनानुसार, लहान वयापासून अतिरिक्त स्क्रीन पाहण्यामुळे मुलांच्या वाढीमध्ये अनेक चिंता निर्माण होण्याची शक्यता असते. स्क्रीनच्या प्रकाशामुळे/किरणांमुळे केवळ त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो इतकेच नव्हे, तर त्यांच्या झोपेच्या चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होते. वाढीच्या वयातल्या मुलांमधे लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर आढळतो. कारण, मुले मोबाईल पाहात पाहात अनेकदा जंक फूड खातात जे आरोग्याला घातक असतं. मुले मोबाईल पाहताना इतकी तल्लीन होतात, की त्यांना काय आणि किती खावे याचे भान राहत नाही. पालकांनी मोबाईलची सवय मुलांना कुठून लागली, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे  आज घराघरामध्ये लहान मुले पाहात असलेला मोबाईल आणि त्यांचा एकूण ‘स्क्रीन टाइम’ हा पालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोना...