कामगार दिन :- जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९०...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।