अतिरिक्त स्क्रीन वापर ही वाढीच्या वयातील मुलांमध्ये डोळ्याचे दोष निर्माण करणारी गोष्ट आहे अनेक मुले तास न् तास मोबाईल पाहतात. अंधारामध्येही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक असते. सतत स्क्रीनवर पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे दोष निर्माण होतात. संशोधनानुसार, लहान वयापासून अतिरिक्त स्क्रीन पाहण्यामुळे मुलांच्या वाढीमध्ये अनेक चिंता निर्माण होण्याची शक्यता असते. स्क्रीनच्या प्रकाशामुळे/किरणांमुळे केवळ त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो इतकेच नव्हे, तर त्यांच्या झोपेच्या चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होते. वाढीच्या वयातल्या मुलांमधे लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर आढळतो. कारण, मुले मोबाईल पाहात पाहात अनेकदा जंक फूड खातात जे आरोग्याला घातक असतं. मुले मोबाईल पाहताना इतकी तल्लीन होतात, की त्यांना काय आणि किती खावे याचे भान राहत नाही. पालकांनी मोबाईलची सवय मुलांना कुठून लागली, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आज घराघरामध्ये लहान मुले पाहात असलेला मोबाईल आणि त्यांचा एकूण ‘स्क्रीन टाइम’ हा पालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोना...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।