मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...

#TETExam 2021 @महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१

 Maharastra TET Exam 2021 . ----------------------------------------------- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार ; अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२१  राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहीर केली आहे. यंदा MAHATET 2021 परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत २५ ऑगस्ट २०२१ आहे. त्याचप्रमाणे राज्यात रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ४० हजार पदांसाठी TAIT परीक्षासुद्धा घेतली जाण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून शासनाकडे वारंवार केली जात आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.          MAHATET 2021 परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या  https://mahatet.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक, परीक्षा फीस, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढील...

#लोकसंख्येचा विस्फोट

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करताना दरवर्षी एका थीमवर काम केलं जाते. यावर्षी “Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights" अशी थीम आहे. सध्या भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे. मुंबई आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावे अपत्य जन्माला आले, तेव्हापासून हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदय...
  भारतातील असे कोणते लोहमार्ग स्टेशन आहे , जेथे एकाच बाकावर बसलेली दोन माणसे दोन वेगवेगळ्या राज्यात बसलेली असतात ?           देशातील सर्वात अद्वितीय लोहमार्ग स्थानक जेथे एकच बाक दोन राज्यात विभागले गेले आहे . ही कथा आहे एका अशा लोहमार्ग स्थानकाची , ज्याचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजरातमध्ये . दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्थानकामध्ये असं काय विशेष असेल , याची आपण कल्पनाही करू शकत नाही .                             वास्तविक हे असं एकमेव रेल्वे स्थानक आहे , जे गुजरात - महाराष्ट्र सीमेला स्पर्श करते . स्थानकात एक बाक आहे , ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहेत . या बाकावर बसलेल्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत , हे लक्षात ठेवले पाहिजे .             येथे तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये स्थानकप्रमुख बसतात . एवढेच नाही , तर गाड्यांच्या घोषणा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये होतात . या स्थ...