मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पारसी नूतनवर्ष दिन

पारशी संस्कृतीमध्ये झोराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार कालगणना होते. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच पतेति सण साजरा करण्यात येईल. तर पुढचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा दिवस पारसी नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाने पारशी कॅलेंडरमधील पहिला महिना फरवर्दीन या महिन्याची सुरुवात होते.पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.पारशी समुदाय हा मूळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते.पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं प...