मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#म्यूकर मायकॉसिस आणि covid-19 देशात ७२०० ईतकी रुग्ण...

#म्यूकर मायकॉसिस   आणि covid-19  कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्यूकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे. कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस.  ' म्यूकर मायकॉसिस' राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.  म्यूकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आह...