मुख्य सामग्रीवर वगळा

पारसी नूतनवर्ष दिन

पारशी संस्कृतीमध्ये झोराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार कालगणना होते. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच पतेति सण साजरा करण्यात येईल. तर पुढचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा दिवस पारसी नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाने पारशी कॅलेंडरमधील पहिला महिना फरवर्दीन या महिन्याची सुरुवात होते.पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.पारशी समुदाय हा मूळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते.पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं.गुजरातच्या संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोक जहाजातून उतरले. याठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक राजे जाधव राणा हेसुद्धा उपस्थित होता. पारशी समाजाच्या नेत्याने राजांना भारतात प्रवेश करून वास्तव्य करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी भाषेच्या अडथळ्यामुळे दोघांमधील संवाद योग्यरित्या होऊ शकला नाही. पण पारशी बांधवांचं म्हणणं त्यांच्या लक्षात आलं.या भूमीवर आधीपासूनच लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे तुम्हाला कसे सामावून घेणार, असा प्रश्न जाधव राणा यांना विचारायचा होता. त्यासाठी सांकेतिक पद्धतीने जाधव राणा यांनी एका पेल्यात काठोकाठ दूध भरून त्यांच्याकडे पाठवून दिलं. राणा यांचं म्हणणं लक्षात आल्यानंतर पारशी समाजातील नेत्याने या दूधात एक चिमूटभर साखर मिसळून दिली.

भारतीय इतिहासात टाटा कुटुंबाचं योगदान प्रचंड मोठं आहे. सध्या टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते. याच टाटा समूहाची पायाभरणी जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांना भारतीय उद्योगजगताचे जनक म्हणून ओळखलं जातं.3 मार्च 1839 रोजी जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी कमी वयातच आपल्या कल्पकतेची चुणूक सर्वांना दाखवली. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी भारत सरकारने आपल्या अखत्यारित केली होती.टाटा समूहाच्या स्वरूपात मोठा वारसा लाभलेल्या रतन टाटा यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनंच केलं. रतन टाटा हे 1991 ते 2012 अशी सुमारे 19 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून होमी भाभा त्यांचे नाव घेतले जाते ,भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी 1945 मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची स्थापना केली होती.1947 ला भारत सरकारने स्थापन केलेल्या आण्विक ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्षही ते होते. ते सुमारे 15 वर्षं या आयोगाचे अध्यक्ष होते. यादरम्यान भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.भारताच्या लष्करी इतिहासातील उल्लेखनीय अधिकाऱ्यांमध्ये सॅम माणेकशॉ यांचा समावेश होतो. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या 1971 च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते.आपल्या तब्बल 40 वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील 5 वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता.

अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या उद्योजक होते आपल्या किशोरवयापासूनच त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. पण त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. अखेर, 1897 साली कुलुपाच्या उद्योगात त्यांना यशाची चावी मिळाली.अर्देशिर गोदरेज हे मुळात व्यवसायाने वकील होते. पण त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. अनेक व्यवसायांमध्ये अपयश येऊनही त्यांचा धीर खचला नाही. सध्या गोदरेजचे 1.1 अब्ज ग्राहक विविध क्षेत्रात आहेत. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांचं उत्पन्न 4 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.

दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे आशियाई नेते होते पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.आज जगभरात विविध संकटांनी डोकं वर काढलेलं असताना नौरोजींच्या कार्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपल्या प्रगतिशील राजकीय इच्छाशक्तीमुळे दादाभाईंचं आयुष्य इतिहासातल्या काळ्या पर्वातही आशेचा किरण होता.दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.