मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा..

*‘रुग्णसेवेच्या यज्ञात लोकप्रतिनिधींची ‘अर्थसंमिधा’* *कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा*  श्रीनाथ वानखडे/दि.22 मे 21 भारतीय शासनव्यवस्थेत वरिष्ठांनी आदेश द्यायचे व कनिष्ठांनी ते पाळायचे.याच व्यवस्थेतील जिल्हा परिषद एक महत्वाचा घटक.कोविडच्या आपत्तीकाळात समाजाला आपलंही देणं लागतं हा विचार मांडल्या गेला.या विचारातूनच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांसह सर्व कर्मचारी एकवटले व वर्गणी गोळा केली.नेहमी आपल्या आदेशाचे पालन करणारे कर्मचारी जेव्हा संघटना मतभेद बाजूला सारून रुग्णसेवाचा यज्ञ तेवत ठेवत आहे हे अनुभवले तेंव्हा या यज्ञात पक्षभेद बाजूला ठेवत जिल्हा परिषद अध्यक्ष सह ईतर सदस्यांनी सुद्धा अर्थसंमिधा अर्पण केली. मे महिन्याच्या सुरुवातीला कोविडची रुग्णसंख्या अचानक वाढीला लागते.अमरावती जिल्हातून कोविड आजाराचे नवीन रूप धारण केल्याच्या वावड्या सर्वत्र उठल्या.याच कालावधीत जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा टाळेबंदी केल्या गेली.जे होत आहे ते भीषण होत आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहे हे अनेकांनी ऐकले होते.यामधून प्राथमिक शिक्षकांच्या एका...