मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#पाणी वाचवा ,जीवन वाचवा!!

पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे ! जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल. तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले...

#छत्रपती संभाजी महाराज..

छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा  आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि  रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या  प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना प्रजेबद्दल आदरभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आण...

#जागतिक महिला दिवस ८ मार्च

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे, आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.  स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरत...