मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

"सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात".

सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.               संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगे महाराज यांचा जन्म  २३ फेब्रुवारी  १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या गावी झाला , त्यांचे नाव डेबुजी होते ,  ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ...

"डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम".

 "डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम". भारताचे प्रख्यात अवकाश-शास्त्रज्ञ व माजी  राष्ट्रपती... वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.  वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम  होते, त्यांचा जन्म 15ऑक्टोबर  1931  तमिळनाडू, भारत  यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते.   ते भारताचे अकरावे राष्ट्रपती.      आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते  "लोकांचे राष्ट्रपती"!! म्हणून लोकप्रिय झाले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत  I.S.R.O  क्षेपणास्त्र koविकासातील एसएलव्ही  सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्...

मेजर ध्यानचंद

  मेजर   ध्यानचंद:- हाॅकीचे   जादूगार   मेजर ध्यानचंद सिंग हे   भारतीय हॉकीचे अलौकिक   खेळाडू होते . त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते . त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे . त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले . त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा . ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला . त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली . जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८ - १ ने नामावल्यानंतर , त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली . त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल...

Which country help in jayakwadi project of Maharashtra State?

  Which country help in jayakwadi project of Maharashtra State?   The Paithan (Jayakwadi) Hydro-electric project completed with the help of  Japan . One of the largest irrigation projects,  Jayakwadi Dam  was created to solve water shortage in the drought prone areas of Maharashtra. located on the banks of  the River Godavari , this erstwhile second century BCE capital of the Satvahana Dynasty has witnessed more hi  the town these days is frequented by many to shop for Paithani sarees, walk in its Vrindavan-style Dnyaneshwar Garden, named after another popular Marathi Saint, and to visit Jayakwadi Dam, one of the largest irrigation projects in the region. Located about 50 km south of Aurangabad, Jayakwadi is also known as Nath  Sagar  and is a massive structure with more than two dozen floodgates.  story than perhaps any other city in the vicinity.  This multipurpose project not only provides water for irrigation in the drought-pron...

Whether D.ED exams in Maharashtra are cancelled or not

  Whether D.ED exams in Maharashtra are cancelled or not -from 19thof November 2021 The Maharashtra D.El.Ed Exam Date release Soon. It is expected the 1st & 2nd Year Exam is scheduled to be held in July/August month.  Maharashtra Board Has Released A Link For Colleges To Fill The Candidate’s Details For Regular & Re-Appear Exam. So It it Expected That the Maharashtra Deled Exam For Regular And Re-Appear Candidates May Start In Starting Of October/November.  Check  Admit Card  &  D.Ed. Date Sheet 2021 for Maharashtra D.Ed. 1st Year & 2nd Year Regular/Re-appear Exam 2021.  Maharashtra State Council of Educational Research and Training, Pune  extended dates for Data Updation for  D.Ed. Written Exam 2021  for 1st & 2nd year Regular and Re-appear students scheduled to be conducted in 2021. The Date Sheet and Admit Card can be downloaded at the official website i.e. www.mscert.org.in.  Also Maharashtra announces ...

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा....

  विजयी   विश्व   तिरंगा   प्यारा ,  झंडा   ऊंचा   रहे   हमारा....         भारताचा   राष्ट्रीय   ध्वज   हा   केशरी  , पांढरा   आणि   हिरवा   असा   आयताकृती   तिरंगा   आहे . त्याच   बरोबर   अशोकचक्र ,  त्याच्या   मध्यभागी   आहे .  भारतीय   राष्ट्रध्वज   २२   जुलै   १९४७   रोजी ,  भारत   देशाला   स्वातंत्र्य   मिळण्याच्या   २४   दिवस   आधी   अंगीकारला   गेला .  २४   मार्च   रोजी   इंंग्रजांनी   भारत   सोडून   जाण्याचा   आपला   निर्णय   जाहीर   केला .  स्वतंंत्र   भारताचा   ध्वज   कसा   असावा   हे   ठरविण्यासाठी   तातडीने   एक   समिती   नेमली   गेली .  घटना   समितीने   २२   जुलैला   या   ठरावाला   मंंजुरी   दिलीआणि ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...