मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"राष्ट्रीय विज्ञान दिवस"

भारताचे मिशन मंगळ: "वैज्ञानिक प्रगतीची नवी उंची" राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये शोधलेल्या "रमण प्रभाव" (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञानाच्या तेजस्वी सूर्यप्रकाशात भारताने आपल्या बुद्धिमत्तेच्या दीपस्तंभाने आकाश व्यापले आहे. अंतराळाच्या अथांग गूढतेत भारतीय विज्ञानाने आपल्या कौशल्याने एक नवा तारा प्रज्वलित केला , "मिशन मंगळ"! भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ISROप्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने 2013 मध्ये इतिहास रचला गेला. मंगळयान, हा भारताच्या विज्ञानाच्या कुशीतून जन्मलेला तेजस्वी मोती, अवकाशाच्या गूढतेत नांदणाऱ्या लाल ग्रहाला स्पर्श करू पाहत होता.ही मोहीम म्हणजे केवळ एक यान नव्हे, तर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची भव्य गगनभरारी होती. संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या आणि भारताने त्या अपेक्...