राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देण्याबाबत आणि शाळांमधील अनुपयुक्त / निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र. क्र. २६६ (ई-१८३९७९९)/एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : १७ सप्टेंबर, २०२६ विषय : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देण्याबाबत आणि शाळांमधील अनुपयुक्त / निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत. संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण११२५/प्र.क्र.२५१/२५/एसएम-१, दि. १६.०४.२०२५. २. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020). ३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियमन, भाग-२, दि. १७.०४.२०१५. ४. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मातंस/नस्ती ०७/प्र. क्र. ८९/३९, दि. ०१.०८.२०११. ५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधिसूचना क्र. पीआरई २०१०/प्र. क्र. २१२ (बी)/पीई-१, दि. ११.१०.२०११. ६. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (दि. २७.०८.२००९). प्रस्तावना : १) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ...