छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना प्रजेबद्दल आदरभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आण...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।