आदिवासी संस्कृती, हक्क आणि अस्मितेला सलाम! दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी आणि मूळनिवासी समाजाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संस्कृतीचे, परंपरांचे आणि भाषांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांना मान्यता देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने २३ डिसेंबर १९९४ रोजी ठराव मंजूर करून दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ही तारीख निवडण्यामागे विशेष ऐतिहासिक कारण आहे. ९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या आदिवासी लोकसंख्येवरील कार्यकारी गटाची पहिली बैठक झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. यापूर्वी डिसेंबर १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने १९९३ हे ‘जागतिक आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर आदिवासी लोकांच्या प्रश्नांकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक गांभ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।