#लहान मुले,करोना व आपली जबाबदारी... लहान मुलांच्या लक्षणांबाबत काही वैद्यकीय शास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत मांडत आहेत. संशोधन करीत आहेत. वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, करोना विषाणूचा कण हा पेशीतील एसीई-२ रिसेप्टरला चिकटतो आणि पेशीमध्ये त्यांची वाढ होऊन, तो शरीराच्या अन्य पेशींमध्ये पसरतो. लहान मुलांमध्ये एसीई-२ ची वाढ जास्त न झाल्याने, करोना विषाणूची बाधा तुलनेने कमी दिसते. करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुलांमध्ये कमी प्रादुर्भाव झालेला असला, तरी त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांमध्ये दिसून येणारी श्वसनसंस्थेशी निगडीत तीव्र लक्षणे आतापर्यंत तरी दिसलेली नाहीत; पण अलीकडेच काही गूढ लक्षणे न्यूयॉर्कमधील काही रुग्णालये, तसेच अमेरिकेतील काही करोनाग्रस्त प्रदेशांत, इंग्लंड आणि स्पेनमधील रुग्णालयांत दाखल झालेल्या लहान मुलांमध्ये दिसली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा जास्त धोकादायक असू शकतो. # नवी लक्षणे, 'कावासाकी डिसीज' आणि 'टॉक्सिक शॉक', ज्याला आपण मराठीत 'विषारी धक्का'...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।