मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#पाणी & आपण

पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते. जिवांना ज्या वस्तूची ज्या अनुपातात गरज असते निसर्गाने ते तत्त्वही त्याचा अनुपातात उपलब्ध करून दिले आहे. परंतु, सध्याचा विचार करता पाणी आणि वायू या दोन्ही गोष्टींबाबत गंभीर संकट निर्माण झाले असेल तर आम्ही नक्कीच कुठे ना कुठे चूक केली हे समजून घेण्याची गरज आहे. पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे.  पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवासह भूतलावर असलेल्या सर्वच प्राण्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी पिण्याचे स्वच्छ पाणी खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुरक्षित पाण्याचा अभाव म्ह...

बालपण दे गा देवा..

मुलांचे बालपण चांगले जावे , त्यांना बालपणात वेगवेगळे अनुभव घेता यावेत, जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल यासाठी प्रत्येक पालकाने त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावली पाहिजे. कारण त्याचे अनेक प्रकारे फायदा मुलांना होतात.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर खेळल्याने मुलांचा व्यायाम होतो. यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होते. त्यांचे टीव्ही बघणे, गेम खेळणे कमी होते.याव्यतिरिक्त सुद्धा बाहेर खेळण्याचे मुलांच्या मानसिक विकासासाठी अनेक फायदे आहेत. @Childhood  मुलांना सामाजिक भान येते  समजा जर तुम्ही मुलांना घरीच ठेवले तर त्यांना बाहेर, चार लोकात कसे वागायचे याची समज येणार नाही. @yoga बाहेर गेल्यावर काय करायचे, काय नाही हे त्यांना शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना बाहेर सोडणे.लोकांशी कसे बोलायचे, आपल्याला काही आडले तर लोकांना मदत कशी मागायची याचे प्रात्यक्षिक त्यांना मिळते.तुमची जर लहानशी फॅमिली असेल तर याचा विशेष उपयोग होईल. परिवारात जर जास्त सदस्य नसतील तर इतरांशी मिळून-मिसळून कसे वागायचे हे मुलांना माहीत नसते. त्यांना जर बाह...