हॉकीचा जादूगार. देशात 2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान यांनी खेळाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलवून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार केले आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस च्या जमान्यात आजकालची मुले कदाचीत हॉकी हा मैदानी खेळ होता तसेच भारतीय राष्ट्रीय खेळ होता हेच विसरले असतिल? कारण माझ्या मुलाला मी सहजच विचारले आपला राष्ट्रीय खेळ कोणता? तर त्याच उत्तर होत क्रिकेट. आता त्यात त्याची किंवा राष्ट्रीय खेळ माहीत नसणाऱ्या नवतरूनांची काय चुकी? एक तर आम्ही हॉकी बद्दल कमालीचे उदासीन . दुसरे शाळेत हॉकी सारखा मोठे मैदान लागणारे खेळ घेतल्या जात नाहीत, घेतले तर माझ्या सारख्या शिक्षकाला हॉकी खेळायचे अपुरे ज्ञान, वरून बॉल लागायची भिती वेगळी? टेलिव्हिजन वरून सुद्धा प्रक्षेपण कमीच? अनेक कारणे सांगता येईल? पण हाच हॉकीचा खेळ एकेकाळी जगात भारताची ओळख देत होता. त्या हॉकीचा भारतात आणि जगात ओळ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।