#किंगकोहली आज विराट कोहली याचे ४९शतक पूर्ण झाली.. हार्दिकअभिनंदन.. @विराट प्रेम कोहली विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे.त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे. कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकँडमीची मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।