#President Of India Resp.Draupadi Murmu. @भारतीय महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.... #Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू , !महामहिम राष्ट्रपती! प्रथम नागरिक भारत, भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल होत्या, द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलआणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुल मरण पावले . द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमाद...