मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून १४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

WORLD BLOOD DONOR DAY

माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु अपघात व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या घरच्यांना स्वतःचा  रक्तगट  माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास  महत्त्वाचे कार्य करते. भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तर...