मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

Buddhism in Odisha

ओरिसा - बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा  Buddhism in Odisha भारतामधील ओरिसा राज्याचे मूळ नाव ओद्र-देसा असून ते बौद्ध संस्कृतीतून उदयास आले आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यात डोकावून बघितल्यास अक्षरशः हजारो पुरातन बौद्ध स्थळे दिसून येतील. यांची नावे आज जरी बदलली असली तरी मूळ संस्कृती अवशेष काही नष्ट झाले नाहीत. आंध्रप्रदेशाची किनारपट्टी ते पश्चिम बंगाल किनारपट्टी पर्यंतचा भाग पुरातन बौद्ध स्थळांनी भरलेला आहे. बंगालच्या उपसागराला लागून असलेले ओरिसा राज्य हे आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमांनी पूर्ण वेढले आहे. एकेकाळच्या या उत्कल प्रांतात सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर सर्व कायापालट केला. धम्मप्रसारासाठी १९ तुकड्या स्थापित केल्या. त्यामुळे त्यांच्या काळातच बौद्ध संस्कृतीची भरभराट येथे झाली. थेरवाद, महासंघीका आणि सर्वस्तीवाद या शाखा तेथे लोकप्रिय झाल्या. म्हणूनच या राज्याच्या केंद्रभागी 'बौद्ध' नावाचा जिल्हा असून इतरही नावे बघितल्यास बौद्ध संस्कृतीची खाणच इथे असल्याचे दिसते. गजापती, गंजम, पुरी, भद्रक, देवगढ, बारगढ, अंगुल, जाजपुर, बालनगीर, बालेश्वर अशा अनेक जिल...
शरद गोविंद पवार !       माणसाच्या जन्माची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याचे प्राक्तन कसे घडणार, हे सुनिश्चीत करत असतेच. शून्यातून विश्व निर्माण करणारांना लाभलेला शून्याचा आकार केवढा होता हे पाहण्याची आपली पद्धत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला आलेला शून्य देखील सारखा नसतोच. पवारांना लाभलेला शून्य काळाच्या बराच पुढचा होता.      शरद गोविंद पवार हे नाव कुठल्याही सामान्य माणसाला सहज चपखल बसू शकेल. या नावाचा शेतमजूर असू शकतो. गवंडी किंवा शाळेत शिपाई देखील असू शकतो. गावाचे नाव सुद्धा काटेवाडी म्हणजे फार काही आकर्षक नाही. शिक्षण बी.कॉम. म्हणजे आजच्या काळात तेही फार मोठे नाही. पण हा जन्मला एका सत्यशोधकी विचारांच्या कुटुंबात. १८८५ला कॉन्ग्रेस पक्षच स्थापन झाला असे नाही. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज देखील त्याच वर्षी स्थापन झाले आणि नीरा उजवा कालवा देखील त्याच वर्षी वाहू लागला. बारामतीचे शेतकरी बागायतदार झाले. पाच दशकांची बागायती सुबत्ता वारसा म्हणून पवार कुटुंबात नांदल्यावर १९४०ला शरद पवार जन्मले‌. आर्थिक, सामाजिक व वैचारिक सुबत्तेचे हे संचित पवारांच्या घरात राजकीय सुबत्ता देखील घ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...