"जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" सावित्रीबाई फुले :- स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रनेत्या , स्त्री शिक्षणाच्या अग्रदूतभारताच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाते. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्री-शिक्षणाच्या आद्यप्रणेती होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य, आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा जोतिराव फुले यांच्याशी झाला. जोतिरावांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि सावित्रीबाईंना शिक्षण देण्यासाठी प्रेरित केले.तेव्हा समाजात स्त्री शिक्षणाला प्रखर विरोध होता. १८४८ साली जोतिराव आणि सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना समाजाचा तीव्र विरोध सहन करावा लागला. लोक त्यांच्या अंगावर चिखल आणि गोमूत्र फेकत असत, परंतु त्या निर्धाराने शिक्षण देत राहिल्या. पुढे त्यांनी पुण्यात आणि आसपासच्या परिसरात अनेक ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।