*बुद्धाची विपश्यना* 🏵️🏵️🏵️ सर्वानाच सुख आणि शांती हवी असते, कारण की आमच्या जीवनांत खरोखरच सुख आणि शांती नसते. आपण सर्वच वेळोवेळी द्वेष,क्रोध,भय,ईर्षा इत्यादि कारणामुळे दुःखी होतो. आणि जेव्हा आम्ही दुःखी होतो तेव्हा ते आपल्यापुरतेच मर्यादित ठेवत नाही तर ते दुःख दुसऱ्यानां देखील वाटतो. जेव्हा कोणती व्यक्ती दुःखी होते तेव्हा आसपासचे वातावरण देखील अप्रसन्न बनविते,आणि त्या व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवर देखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.आपण स्वतःही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर पारस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील? आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।