कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा.. लहान मुलांमध्ये अतिसार, उलटी आणि पोटदुखी ही कोरोना संसर्गाची लक्षणं असू शकतात, असा ब्रिटीश संशोधकांचा दावा आहे. क्विंस युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये कोरोना विषाणू आणि लहान मुलं या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधकांच्या मते कोरोना विषाणूची जी लक्षणं सांगितली जात आहेत त्यात या नवीन लक्षणांचाही समावेश करायला हवा. सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणं आहेत - ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलंही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-19 चाचणी करण्यासही सांगण्यात आलं आहे. मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटीश संशोधक करत असलेल्य या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मेडरिक्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार 992 मुलांपैकी 68 मुलांच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज आढळल्या. ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत त्यातल्या निम्म्या मुलांमध्ये कोव्हिड-1...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।