संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ? आज विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी एका विटभट्टीवर गेलो . एक आठ वर्षाचा मुलगा ४०से. तापमानात माती गाळतांना दिसला. घामाघूळ झालेला आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही घास न घेतलेला मुलगा काम करतांना त्याच्या वडीलाला विचारले की , तुम्ही एवढी सुंदर विट बनविता त्या विटेने सुंदर कलाकृती इमारत तयार होते मग तुला वाटत नाही का आपल्या या मुलाचं आयुष्य चांगले जावे . साहेब , मलाबी वाटते हे मुले शिकावे , शाळेत जावे पण मजबुरी आहे . आता खरीच वाढवतो त्याला . विटभट्टी मालकांनी स्वतःहून सांगितले की , मी यांना स्वतः घेवून जातो , अरे ही मुले शिकली पाहीजे अशीच जर काम करत गेली तर दुखाची बाब आहे . आता बालरक्षकही तेथे पोहचले त्यांना दाखल केले आणि हा विषय संपला मग प्रश्न हा पडतो जेथे पालकाचीच इच्छा नाही तेथे काय ? माझ्या एका मित्रांनी मला मॅसेज केला जर पालकच मुले कामावर नेत असतील तर त्या पालकाना काय म्हणावे ? ऊसतोडीसाठी तांड्याचे तांडे बाहेर पडतात अडकतात पालकासंगे स्थलांतर होणारी निरागस बालके . रोजगार जगण्यासाठी मह...