चिमणी दिवस: निसर्गाच्या सूरमय गाण्याचा साक्षीदार... निसर्गाच्या कोंदणात चमकणारा एक लहानसा, नाजूक, पण अत्यंत जिवंत स्वर,तो म्हणजे चिमणीचा चिवचिवाट! जणू कवीच्या ओळींना ताल मिळावा तसे तिचे मंजुळ स्वर मनाला आनंद देतात. पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात, झाडांच्या फांद्यांवर, छताच्या कपारीत आणि ओसऱ्यांमध्ये सहज दिसणारी ही सजीव काव्यकळा आज मात्र आपल्यापासून हरवू लागली आहे. शहरीकरणाच्या दणक्यात हरवलेली ही नाजूक चिमणी, निसर्गाच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. तिच्या अस्तित्वावर घोंगावणाऱ्या संकटांनी पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. याच भानावर ठेवत २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून आपण या नाजूक जीवांच्या संवर्धनासाठी जागरूक होऊ आणि त्यांना पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवू.चिमणी ही केवळ एक साधा पक्षी नाही, तर ती निसर्गाच्या अविरत संगीताची एक सुरेल तान आहे. तिच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.ज्या परिसरात चिमण्यांचे वास्तव्य आहे, तो परिसर समृद्ध आणि सजीव असतो. त्या लहान कीटक, अळ्या, अन्नधान्याचे तुकडे आणि गवताच्या बिया खाऊन निस...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।