Shahuji Maharaj --------------------------- शैक्षणिक क्रांतीचे जनक :-"शाहू महाराज" काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे हे आपण अनेक नेत्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकत असतो आणि पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला कि एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आज भारतात जातीवाद असला तरी त्याची धार बरीच बोथट झालेली आहे. आजही समाजात विषमता दिसून येत असली तरी त्याची तीव्रता व प्रमाण पूर्वीसारखे राहिलेले नाही. ह्याचे श्रेय शाहू, फुले, आंबेडकर ह्यांना व ह्यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांना जाते. बहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील व...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।