मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ. गणेश बारैया — उंची शरीराची, पण कर्तृत्व आभाळाएवढे!

डॉ. गणेश बारैया — उंची शरीराची, पण कर्तृत्व आभाळाएवढे! “व्यंग हे शरीरात असतं, मनात नाही!” या वाक्याचा अर्थ केवळ शब्दांत नाही, तर आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. गणेश बारैया .अवघ्या तीन फूट उंचीचे गणेश लहानपणापासूनच अनेक अडचणींना सामोरे गेले. त्यांच्या शारीरिक उंचीवरून त्यांना टोमणे ऐकावे लागत. प्राथमिक शाळा घरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर होती. वाहतुकीची सोय नसल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकदा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना खांद्यावर बसवून शाळेत नेले. गरिबी होती, अडचणी होत्या; पण मुलाच्या शिक्षणाबद्दल आई-वडिलांची जिद्द मात्र मोठी होती.गणेश यांच्या तीन फूट उंचीवर एका सर्कसवाल्याची नजर पडली. त्याने गणेश यांना सर्कसमध्ये घेण्यासाठी त्यांच्या वडिलांसमोर पाच लाख रुपयांची बोली लावली. परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांच्या वडिलांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला. “मी माझ्या मुलाला विकणार नाही; त्याला शिकवणार आणि त्याचे भविष्य घडवणार,” हा त्यांच्या वडिलांचा निर्धार गणेश यांच्या मनात कायमचा कोरला गेला.याच निर...