हिरालाल बाबूलाल मकेश्वर ( केंद्रप्रमुख ) हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा अल्पसा परिचय डॉ हिरालाल बाबुलाल मकेश्वर मुळगाव वाठोडा शुक्लेश्वर पंचायत समिती भातुकली जिल्हा अमरावती.त्यांचे इयत्ता पहिली पासून ते एम. ए. बी. एड. पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण हे उर्दू भाषेत झाले आहे त्यांची एकूण 36 वर्ष सेवा झाली आहे .ते सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. आणि त्यानी प्रत्येक पदाला योग्य न्याय दिला आहे .त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते अनेक उर्दू भाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही असायचीच त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गुरुजनांचे मार्गदर्शन सहकाऱ्यांचे प्रेम यामुळेच ते अनेक अडचणींवर मात करत पुढे जात राहिले. त्यांच्या कणाकणात उर्दू भाषा जाणवत होती. त्यांनी 26 वर्ष अध्ययन अध्यापनाचे कार्य फक्त उ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।