मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

डॉ. हिरालाल मकेश्वर मराठी माणूस उर्दू शिक्षक.

हिरालाल बाबूलाल मकेश्वर ( केंद्रप्रमुख ) हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा अल्पसा परिचय डॉ हिरालाल बाबुलाल मकेश्वर मुळगाव वाठोडा शुक्लेश्वर पंचायत समिती भातुकली जिल्हा अमरावती.त्यांचे  इयत्ता पहिली पासून ते एम. ए. बी. एड. पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण हे उर्दू भाषेत झाले आहे  त्यांची एकूण 36 वर्ष सेवा झाली आहे .ते सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. आणि त्यानी प्रत्येक पदाला योग्य न्याय दिला आहे .त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते अनेक उर्दू भाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही असायचीच त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गुरुजनांचे मार्गदर्शन सहकाऱ्यांचे प्रेम यामुळेच ते अनेक अडचणींवर मात करत पुढे जात राहिले. त्यांच्या कणाकणात उर्दू भाषा जाणवत होती. त्यांनी 26 वर्ष अध्ययन अध्यापनाचे कार्य फक्त उ...

#वैशाख पौर्णिमा ...

"वैशाख पौर्णिमा "     # २६_मे_बुध्द_पौर्णिमा, #बुद्ध_जयंती..    विश्ववंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीच्या, अखंड विश्वाला मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!!       सुक्ष्मजीवा पासुन ते मानव जातीचा, संपूर्ण सृष्टीचा दुःख मुक्तीचा, कल्याण कारी, आंनदाचा व वैभवाचा दिवस, याच वैशाखी पौर्णिमेला, या सृष्टीमध्ये तीन अतिशय कल्याणकारी घटना घडल्या 1) सिध्दार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला  2) सिध्दार्थाला संबोधी प्राप्त झाली वैशाखी पौर्णिमेला  3) तथागत सम्यक सम्बुध्द यांच महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेलाच...... अशी ही पवित्र व मंगल वैशाखी पौर्णिमा,  तुम्हाला वेदनामुक्त, वासनामुक्त, विकारमुक्त असो, तुमच्या जीवनात मंगल मैत्री व करुणेची वृध्दी होऊन प्रज्ञा जागृत हो. धम्माचे आचरण तुमच्या हातून घडो.     "सर्वांचे कल्याण होवो.        बुद्धांनी   सारनाथ   येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या स...

#कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा..

*‘रुग्णसेवेच्या यज्ञात लोकप्रतिनिधींची ‘अर्थसंमिधा’* *कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा*  श्रीनाथ वानखडे/दि.22 मे 21 भारतीय शासनव्यवस्थेत वरिष्ठांनी आदेश द्यायचे व कनिष्ठांनी ते पाळायचे.याच व्यवस्थेतील जिल्हा परिषद एक महत्वाचा घटक.कोविडच्या आपत्तीकाळात समाजाला आपलंही देणं लागतं हा विचार मांडल्या गेला.या विचारातूनच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांसह सर्व कर्मचारी एकवटले व वर्गणी गोळा केली.नेहमी आपल्या आदेशाचे पालन करणारे कर्मचारी जेव्हा संघटना मतभेद बाजूला सारून रुग्णसेवाचा यज्ञ तेवत ठेवत आहे हे अनुभवले तेंव्हा या यज्ञात पक्षभेद बाजूला ठेवत जिल्हा परिषद अध्यक्ष सह ईतर सदस्यांनी सुद्धा अर्थसंमिधा अर्पण केली. मे महिन्याच्या सुरुवातीला कोविडची रुग्णसंख्या अचानक वाढीला लागते.अमरावती जिल्हातून कोविड आजाराचे नवीन रूप धारण केल्याच्या वावड्या सर्वत्र उठल्या.याच कालावधीत जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा टाळेबंदी केल्या गेली.जे होत आहे ते भीषण होत आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहे हे अनेकांनी ऐकले होते.यामधून प्राथमिक शिक्षकांच्या एका...

जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.

*👉🏻 जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.* *👉🏻 25 बेडची झाली तातडीने उपलब्धता.* *👉🏻 कोविड केअर सेंटर  उभारणीसाठी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या आर्थिक सहयोगाचा लागणार हातभार.*       अमरावती.. 21 मे 2021      *जिल्हा परिषद अमरावती द्वारा संचालित कोविड केअर व समुदेशन सेंटरचे लोकार्पण जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य तथा वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, समाज कल्याण सभापती दयाराम काळे, महिला व बाल कल्याण सभापती सौ पूजाताई संदीप आमले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले, यांच्यासह मान्यवर जि प सदस्य, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, कर्मचारी संघटना प्रतिनिधी, शिक्षक संघटना प्र...

#पवित्र रमजान

पवित्र रमजान।                                        ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे.  ईद या शब्दाचा अर्थ शयछआनंद असा आहे.  तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे. पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात .या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून ये...

#लहान मुले करोना व आपली जबाबदारी भाग -१

#लहान मुले करोना व  आपली जबाबदारी भाग -१ तारे जमी पर _ मित्रानो ,सध्या  Covid -19 ब्रेक द चेनमुळे शाळा आणि छंद शिबीर  कार्यक्रमांना सुटी असल्यामुळे मुलांनी घरी बसणे हे कसे फायेदशीर आहे, हे त्यांना समजावून सांगा. करोनाचा संसर्ग त्यामुळे कसा टाळता येतो, ते सांगा. घरी बसणे हा करोनाचा संसर्ग टाळण्याचा खात्रीशीर उपाय असल्यामुळे, त्यांचे जीवन लवकरच पूर्ववत होईल, याची खात्री द्या. जनसंपर्क टाळणेही आवश्यक आहे.मुलांना कोडी, कला, वाचन, संगीत ऐकणे किंवा शिकणे अशा गोष्टींसाठी उद्युक्त करा. मुलांशी खेळा. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवा. काही गोष्टी आपल्या मुलांकरितासुवाविल्या  आहेत अवलंब करण्याचा प्रयत्न करावा ,ही विनंती गूगल डूडल गूगल डूडल हे गूगलच्या शोधयंत्रावर असलेले चित्र/लोगो आहे. गुगलच्या लोगोला एखाद्या प्रसिद्ध समारंभ, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंती किंवा जागतिक दिन विशेष या निमित्त बदलवून तो त्या दिन विशेष अनुरुप तयार केला जातो. अशा तयार केलेल्या गुगल च्या लोगोला गुगल डूडल म्हणुन ओळखता  गूगल डूडल हा एक खास तात्पुरता बदल आहे ज्यामुळे सुट्टी, कार्यक्रम आणि लोकांच्या कर्तृत्...

#लहान मुले करोना व आपली जबाबदारी.

#लहान मुले,करोना व आपली जबाबदारी... लहान मुलांच्या लक्षणांबाबत काही वैद्यकीय शास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत मांडत आहेत. संशोधन करीत आहेत.  वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, करोना विषाणूचा कण हा पेशीतील एसीई-२ रिसेप्टरला चिकटतो आणि पेशीमध्ये त्यांची वाढ होऊन, तो शरीराच्या अन्य पेशींमध्ये पसरतो. लहान मुलांमध्ये एसीई-२ ची  वाढ जास्त न झाल्याने, करोना विषाणूची बाधा तुलनेने कमी दिसते. करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुलांमध्ये कमी प्रादुर्भाव झालेला असला, तरी त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांमध्ये दिसून येणारी श्वसनसंस्थेशी निगडीत तीव्र लक्षणे आतापर्यंत तरी दिसलेली नाहीत; पण अलीकडेच काही गूढ लक्षणे न्यूयॉर्कमधील काही रुग्णालये, तसेच अमेरिकेतील काही करोनाग्रस्त प्रदेशांत, इंग्लंड आणि स्पेनमधील रुग्णालयांत दाखल झालेल्या लहान मुलांमध्ये दिसली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा जास्त धोकादायक असू शकतो. # नवी लक्षणे,                             'कावासाकी डिसीज' आणि 'टॉक्सिक शॉक', ज्याला आपण मराठीत 'विषारी धक्का'...

#म्यूकर मायकॉसिस आणि covid-19 देशात ७२०० ईतकी रुग्ण...

#म्यूकर मायकॉसिस   आणि covid-19  कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्यूकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे. कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस.  ' म्यूकर मायकॉसिस' राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.  म्यूकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आह...

#मातृदिन 2021

मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.तसेच मातृत्व, मातृभाषा आणि समाजात मातेचा प्रभाव आहे. हा जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो, सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा साजरा केला जातो.काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात।।मातृदिन हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.मदर्स डे चे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. इ.स. १९१४ मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू आणि शुभेच्छा देतात.  आईवर तसे आपण वर्षातील ३६५ दिवस प्रेम करत असतो   आपल्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी गृहित धरतो आणि आईला तर अगदी हक्काने. त्यामुळे तिचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा...

#covid 19 second Wave #कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा..

कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा.. लहान मुलांमध्ये अतिसार, उलटी आणि पोटदुखी ही कोरोना संसर्गाची लक्षणं असू शकतात, असा ब्रिटीश संशोधकांचा दावा आहे. क्विंस युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये कोरोना विषाणू आणि लहान मुलं या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधकांच्या मते कोरोना विषाणूची जी लक्षणं सांगितली जात आहेत त्यात या नवीन लक्षणांचाही समावेश करायला हवा. सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणं आहेत - ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलंही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-19 चाचणी करण्यासही सांगण्यात आलं आहे. मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटीश संशोधक करत असलेल्य या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मेडरिक्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार 992 मुलांपैकी 68 मुलांच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज आढळल्या. ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत त्यातल्या निम्म्या मुलांमध्ये कोव्हिड-1...

#ब्रेक द चेन#संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी..

ब्रेक द चेन संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक   जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी अमरावती, दि. 7 : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात 9 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून 15 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी 7 ते सकाळी 11 दरम्यान करता येईल. हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपो...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...