मुख्य सामग्रीवर वगळा

हॉकीचा जादूगार.

 हॉकीचा जादूगार.देशात 2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान  यांनी खेळाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलवून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार केले आहे.
क्रिकेट, फुटबॉल, टेनिस च्या जमान्यात आजकालची मुले कदाचीत हॉकी हा मैदानी खेळ होता तसेच भारतीय राष्ट्रीय खेळ होता हेच विसरले असतिल?
कारण माझ्या मुलाला मी सहजच विचारले आपला राष्ट्रीय खेळ कोणता? तर त्याच उत्तर होत क्रिकेट.
आता त्यात त्याची किंवा राष्ट्रीय खेळ माहीत नसणाऱ्या नवतरूनांची काय चुकी? एक तर आम्ही हॉकी बद्दल कमालीचे उदासीन . दुसरे शाळेत हॉकी सारखा मोठे मैदान लागणारे खेळ घेतल्या जात नाहीत, घेतले तर माझ्या सारख्या शिक्षकाला हॉकी खेळायचे अपुरे ज्ञान, वरून बॉल लागायची भिती वेगळी?
टेलिव्हिजन वरून सुद्धा प्रक्षेपण कमीच? अनेक कारणे सांगता येईल?
पण हाच हॉकीचा खेळ एकेकाळी जगात भारताची ओळख देत होता.
त्या हॉकीचा भारतात आणि जगात ओळख देण्याचे काम जर कोणी केल असेल तर ते *हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांनी*
सैन्य कुटुंबात जन्माला आलेले ध्यानचंदला लहान पासुनच हॉकीचे आकर्षण म्हणून हॉकीची स्टिक मिळत नव्हती तेव्हा झाडाच्या फांदीचा उपयोग स्टिक म्हणून करत हॉकीत नैपुण्य निर्माण केल.
ऑलिम्पिक स्पर्धेत सतत तीन वेळा वर्ल्ड चॉम्पियन पटकावून जगात वेगळेच स्थान निर्माण केले.
एवढेच नव्हे तर 1936 मध्ये जर्मनीत जर्मनीला 8-1. हरवित तत्कालीन जर्मनहुकुमाशहा हिटलर याचे मन जिंकले. हिटलर तर एवढा प्रभावित झाला की त्याने ध्यानचंद ला सैन्य दलात मोठया अधिकाऱ्याची ऑफर दिली पण देशभक्त मेजर ध्यानचंद यांनी ती नाकारली. अशा महान खिलाडूला जीवनात अनेक पुरस्कार भेटले.
 त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिंनम्हणुन साजरा करण्यात येतो. पण.......... 
मेजर ध्यानचंद ज्या पदाचे खरे दावेदार होते ते अजूनही त्यांना मिळाले नाही ही हूरहूर नक्की मनाला लागते.ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सोमेश्वर दत्त  सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन   हिटलरने नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल व  हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पदंभूषण  सत्कार करण्यात आला. 
मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान
 बालका पासून वृद्धा पर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातह अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते.आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते.खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावया स लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमाची  खेळा  शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीह वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो. खेळातील चढा ओढी मुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्रा राष्ट्रांती ल क्रीडास्पर्धां मुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यह वाढीस लागते.
खेळांचे निरनिराळ्या  अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रमुख प्रकार पडतात. बैठे  खेळ म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ. उदा., पत्त्यांचे खेळ, बुद्धिबळ सोंगट्या, , कॅरम इत्यादी. मैदानी खेळांतह छोटे मैदानी खेळ व मोठे मैदानी खेळ असे प्रकार असतात. छोट्या मैदान खेळांना छोटी बंदिस्त जागा व आखलेली क्रीडांगणे लागतात. या प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ येतात तर खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी इ. देशी खेळ येतात. दुसऱ्या प्रकारच्या मैदानी खेळांना मोठी मैदाने लागतात. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोलो, बेसबॉल, गोल्फ इ. विदेशी खेळ मोडतात. यांशिवाय क्षेत्रीय शर्यतींच खेळ असतात १०० मी.,  २०० मी. ते मॅरॅथॉन शर्यत  फेकण्याच गोळाफेक थाळीफेक इ उड्यां लांब उडी, उंच उडी इ. सर्व प्रकार आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. पोहणे व पाण्यातील खेळ या गटात विविध प्रकारांनी व विविध अंतरे पोहून जाण्याच्या शर्यती, वॉटर-पोलो  उंचीवरून पाण्यात निरनिराळ्या प्रकारच्या उड्या आणि सूर मारणे इत्यादींचा अंतर्भाव होतो.  खेळात वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्या, इत्यादींची गणना होते. शारीरिक   कसरतीखेळांमल्लखांब, आडवा दंड, जोड दंड,  घोडे,  यांसारख्या साधनांच्या आधारे करावयाच्या विविध शारीरिक कसरती व जमिनीवर करावयाच्या कोलांट उड्या,  यांसारख्या कसरती येतात. शीत कटिबंधातील देशांत जमिनीवर हिम पडते. तेथे अनेक प्रकारचे बर्फावरील खेळ खेळले जातात. त्यांत अनेक घसरण्याच्या शर्यती  व बर्फावरील हॉकी यांसारखे खेळ अंतर्भूत होतात. साहसी व रोमांचकारी खेळांत यंत्रविरहित आकाशयानातून उड्डाण करणेमोटारसायकलींच्या शर्यती, मोटार-शर्यती इ. येतात. मानवाच्या धाडसी प्रवृत्तीला अशा खेळांमुळे आव्हान मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.