मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार*🪐🪐🌔

 21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार       सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.  🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता....