मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अबुलकलाम आझाद

अबुलकलाम आझाद भारतीय  राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’  -"स्वतंत्र" हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकार...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.२००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी १९५२ मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना  च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी वापरल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राज्य केले. ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये  आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. रझाकुल इस्लाम, कॅनडातील व्हॅंकुव्हरमध्ये राहणारी बंगाली या संकल्पनेची सुचना देण्यात आली. त्यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्...

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज

१९फेब्रुवारी सोळाशे ३० हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी , लोककल्याणकारी राजे , शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. " प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल"! शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले.शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून  स्...

क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

लहुजी साळवे हे "लहुजी वस्ताद" नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावात   झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे.  वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणा...

"संत रोहिदास महाराज"

महान  संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.  रविदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते.रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब,  उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू  म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता. हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंच वाणी मजकुरामध्ये रविदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले  रविदास यांचा जन्म वाराणस...

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज  हे शूरवीर बंजारा समाजाचे सतगरु होते. क्रांतिसिंह सेवादास महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला.  धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली. समाज सुधारण्यासाठी त्यांनी काही वचनेदिली:- चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका। केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका जाणंजो छाणंजो पछच माणजो। – भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा. "सेवा बल्लीज" म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंजारा जीवनासाठी त्यांनी २२प्रमुख तत्त्वे दिली जंगल आणि पर्यावरणाचे रक...

माता रमाई बाबासाहेब आंबेडकर

"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई,धन्य रमाई |" रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न...