मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी व्याकरण @समास प्रकार

समास प्रकार :   दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. ,  (१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो.  उदा.,दररोज,यथाक्रम. (२) तत्पुरुष– हा समास उत्तरपदप्रधान असतो.या समासात दुसरे पद महत्वाचे असते. या समासाचे कर्मधारय, द्विगु, उपपदतत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत. परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलिकडच्या काळात विभक्ति तत्पुरुष, प्रादितत्पुरुष, नञ्-तत्पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात. समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरणदृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते. कर्मधारय– सामान्याधिकरण्यात म्हणजे दोन समान विभक्तींत (प्र...