मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

# राजमाता अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर एक अतिशय,दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात  माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठ...

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते.व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला.भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रानटी सुलतानांच्या गुलामगिरीत होता आणि आता इंग्र...