१९फेब्रुवारी सोळाशे ३० हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी , लोककल्याणकारी राजे , शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. " प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल"! शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले.शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।