राष्ट्रीय शिक्षण धोरण ~ शिक्षक : -बदलाचे प्रणेते NATIONAL EDUCATION POLICY 2020 शालेय शिक्षणातील सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना मूर्त उच्चशिक्षित व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षित आणि सुसज्ज शिक्षकांकडून शिकविले जाईल याची दक्षता घेणे. या धोरणानुसार शिक्षक “ समाजातील सर्वात महत्वाचा व्यक्ती आहेत आणि अपेक्षित बदलाचे प्रणेते ” आहेत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येणारे कोणत्याही प्रयत्नाचे यश शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. वंचित ग्रामीण व आदिवासी भागातील हुशार विद्यार्थ्यांना चार वर्षाचा एकिकृत केलेला बीएड .अभ्यासक्रम घेता यावा या करिता त्यांच्यासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल ,काही बाबतीत त्यांना त्यांच्या स्थानिक भागात रोजगाराची हमी देण्यात येईल .विशेषता विद्यार्थिनीवर खास लक्ष केंद्रित करण्यात येईल. सर्व शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती “ सर्वसमावेशक शिक्षक आवश्यकता नियोजन ” शैक्षणिक यावर आधारित कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून केली ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।