संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
शिक्षणात सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे शाळाबाहय मुले ..... क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी चालवलेली चळवळ संपूर्ण महाराष्ट्रानी पाहिलेली. अनेक समाजसुधारकानी महाराष्ट्रात शिक्षणासाठी अमुल्य उदाहरणे वा दिवा तेवत ठेवला . घटनेने दिलेला शिक्षणाचा हक्क वरील साऱ्या गोष्टी पाहता महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला दिसतो यात तिळमात्र शंका नाही पण जेव्हा आपण सिंग्लनवर शेकडो शाळाबाह्य मुलांना भिक मागतांना पाहतो. महाराष्ट्रातील हजारो विटभट्ट्यावर हजारो शाळाबाहय मुलांना काम करताना पाहतो . मोठ्या बांधकामासाठी आलेल्या झोपड्यात वावरतांना स्थलांतरीत झालेली हजारो शाळाबाहय मुलांना पाहतो . ऊस तोडीसाठी , कापुस वेचणीसाठी , संत्रातोडीसाठी , सोयाबिन कापणीसाठी स्थंलातरीत झालेली शेकडो मुलांना पाहतो त्यावेळेस शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असे का ? उत्तर एकच सर्वच स्तरावरून दुर्लक्षित केलेला घटक " शाळाबाहय मुले ". ही मुले फक्त का बालरक्षकाना दिसते असे नाही तर अधिकारी वर्गापासून तर मंत्री महोदयापर्यंत सर्वांनाच दिसते विशे...