हिमा दास : "संघर्षातून सुवर्ण कळसाकडे"भारतीय अॅथलेटिक्समध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी हिमा दास ही केवळ एक धावपटू नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग कसा करावा याचा जिवंत आदर्श आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हिमा आज भारताची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखली जाते. तिच्या जीवनप्रवासात अडथळे होते, अंधार होता, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने तिला प्रकाशाकडे नेले. ९ जानेवारी २००० रोजी आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात हिमा दासचा जन्म झाला. तिचे वडील शेतकरी होते, घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. पण परिस्थितीपेक्षा मोठी तिची जिद्द होती. लहानपणापासूनच तिला फुटबॉलची आवड होती, पण तिच्या प्रशिक्षकांनी तिच्या वेगावर लक्ष ठेवून तिला धावण्याचा सल्ला दिला. तिच्याकडे धावण्याचे बूट घेण्यासाठी पैसे नव्हते. पण इच्छाशक्तीसमोर आर्थिक अडचणी टिकू शकत नाहीत. एका स्पर्धेसाठी तिने साध्या बूटांवर हाताने ‘आदिदास’ असे लिहिले आणि मैदानात उतरली. तिच्या वेगाने आणि जिद्दीने सर्वांनाच अचंबित केले. जेव्हा तिने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा ‘Adidas...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।