जेष्ठ पौर्णिमा बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मास आलि तिचे नाव "सुजाता" होते. त्या गावी असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून प...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।