संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाषगकणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात. जगात तसे असतात, अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात, टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही! मला माहीत आहे. सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमांन घ्यायला ! तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा, शिकवा त्याला, आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडाना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं! जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी... सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं! शाळेत त्याला हा धडा...